Posts

श्री गणेशा!

Image
श्री गणेशा! श्री गणेशा ...    तू सुखकर्ता ....तू दुखःहर्ता म्हणून तर... आम्ही भजतो तुला प्रत्येक कार्यारंभी ....पुजतो तुला! तुला इथं पुजतात...तुला तिथंही पुजतात तुला फक्त भारतातच नव्हे तर अगदी परदेशातही पुजतात! तरीही... श्रीगणेशा .... इथंही हाल.....सामान्यांचे तिथंही हाल .....सामान्यांचे इथंही आतंक....तिथंही आतंक इथंही बळी .... तिथंही बळी तरीही तू सुखकर्ता....? तरीही तू दुखःहर्ता? की श्रीगणेशा.... सुखदुखाःच्या व्याख्याच तू बदलवल्यास? तसे असेल तर...... श्रीगणेशा तू लवकर ये! आम्हाला तशी .... स्पष्ट जाणीव दे म्हणजे मग....आम्हीही ठरवू... तुझं स्वागत  कसं करायचं ते.... कारण ....? कारण श्री गणेशा....  तुला कल्पना नसेल.... हल्ली काळ खूप बदललाय! तू फक्त दहा दिवस येतोस...मस्त मजेत राहतोस... आमचं नाच, गाणं, सजावट, मिरवणूक यातच दंग राहतोस... तुला सगळं आलबेल वाटतं पण ...पण श्री गणेशा.... तसं नाही! जरा नीट बघ....आजूबाजूस बघ....मग तुला पटेल... तू सुखकर्ता नाहीस....तू दुखहर्ता नाहीस.... कर्ता करविता.... तुझा भक्तच आहे सर्व दोष मात्र .....तुलाच देत आहे सर्व दोष मात्र